नेत्यांच्या गाड्यांचे अपघात की घातपात ? उध्दव ठाकरे गटातील संजय कदम यांच्या कारला आयशर ट्रक ने मागच्या बाजूने दिली जोरदार धडक

मुंबई : निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये नेत्यांचे दौरे वाढत आहेत. परंतु आजवर नव्हत ते यावेळेस घडत आहे. नेत्यांच्या गाड्यांना रोडवर अपघात होण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. हे अपघात जर घडवून आणले जात असतील तर महाराष्ट्रातील राजकारणाने आणखी नीच पातळी गाठली आहे असच म्हणावं लागेल परंतु अजून तरी असे कांहीं पुरावे समोर आलेले नाहीत.
काल शिवसेना ठाकरे गटाचे रायगड लोकसभा मतदारसंघ समन्वयक संजय कदम यांच्या कारला भीषण अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबई कुर्ला मार्गावर प्रवास करताना संजय कदम यांच्या कारला आयशर ट्रकने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत कारच्या मागच्या बाजूचा चुराडा झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आयशर ट्रक ताब्यात घेतला आहे.
काल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगड जिल्हयातील रोहा येथून शिवसेना ठाकरे गटाचे रायगड लोकसभा मतदारसंघ समन्वयक संजय कदम प्रचार सभा आटोपून मुंबईला परत जात होते. त्यावेळी वाटेतच त्यांच्या कारचा अपघात झाला. यात गाडीच मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. संजय कदम यांच्यासह कारमधील अन्य व्यक्ती सुखरूप आहेत.
काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारला देखील भीषण अपघात झाला होता.
राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नेत्यांच्या वाहनाला अपघात होण्याच्या घटना वाढतच आहेत. आज देखील संजय कदम प्रचार सभा उरकून घरी जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. त्यामुळे राजकीय वतृळात एकच खळबळ उडालीये.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत