दैनिक जागृत भारत च्या वतीने भगवान महावीर जयंती च्या सर्वांना अनेक मंगल कामना..

आज २१ एप्रिल २०२४ रविवार रोजी अहिंसेच्या तत्त्वावर भर देणारे भगवान महावीर यांचा जयंती उत्सव सर्वत्र साजरा केला जात आहे. यानिमित्त दैनिक जागृत भारत च्या वतीने त्यांच्या गुणांचे चिंतन आणि सर्वांना अनेक अनेक मंगल कामना..
दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते. यावर्षी २१ एप्रिल रोजी महावीर जयंती साजरी केली जाणार आहे. महावीर जयंती हा जैन धर्मियांचा सर्वात मोठा सण आहे. भगवान महावीर यांना वर्धमान या नावानेही ओळखले जाते.
भगवान महावीर हे २४ वे आणि शेवटचे जैन ऋषी मानले जातात. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस जैन धर्मियांसाठी हा एक शुभ दिवस असतो. जैन धर्माचे शेवटचे आध्यात्मिक गुरु (महावीर) यांच्या स्मरणार्थ हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
दैनिक जागृत भारत च्या वतीने भगवान महावीर यांना विनम्र अभिवादन व जयंती च्या सर्वांना अनेक मंगल कामना..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत