राष्ट्रध्वजाचा, राष्ट्रगीताचा, स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करणाऱ्या, संविधानाचा द्वेष करणाऱ्या भीमा कोरेगाव दंगलीतील संशयित संभाजी भिडे याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी वेळात वेळ काढून दिली भेट ! एवढा राजकीय वरदहस्त असल्यावर कायद्याची परवा कोण करेल?

सांगली : एकीकडे केवळ संशया वरून अरविंद केजरीवाल सारख्या प्रगतिशील मुख्यमंत्र्यांना जेल मध्ये टाकल आहे तर दुसरीकडे भीमा कोरेगाव दंगली मधील संशयित चिथावणीखोर भिडे आणि एकबोटे खुलेआम फिरत आहेत. नव्हे गृहमंत्र्यांची सदिच्छा भेट घेत आहेत.
जातीयवादी शक्तिंचे लागेबांधे समाजापासून लपत नाहीत. संभाजी भिडे हा स्वताला अती सामान्य सांगणारा व्यक्ती मोदी शहा फडणवीस आले की भेटायला जातो आणि ते लोकही भेट देतात. नेमकी काय चर्चा घडते आणि कोणत्या गोष्टींसाठी प्रोत्साहन आणि समर्थन भेटते हा खरा प्रश्न आहे.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे कवलापूर येथील विमानतळावर आल्यानंतर संभाजी भिडे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी भिडे फडणवीसांच्या कानात काहीतरी सांगत होते. ही चर्चा नेमकी काय झाली हे समजू शकलेले नाही. कदाचित 400 पार आणि संविधान संपवण्यासाठी काय करता येईल यावर विचारविनिमय झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान अशा महापुरुषांचा अपमान करणाऱ्या, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत बदलण्याची भाषा करणाऱ्या दंगलखोर, बेताल व्यक्तीला राज्याच्या गृहमंत्र्यांनी भेट देणे चर्चा करणे म्हणजे यांच्या कृतींना कायदेशीर कारवाई तर लांबच सोडा पण राजकीय वरदहस्त आहे की काय अशी चर्चा जनमानसात रंगली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत