महान चक्रवर्ती सम्राट अशोक-जयंती.

महान चक्रवर्ती राजा सम्राट अशोक जगातील
सर्वात बलाढ्य, संपत्तीवान राजा होता.
म्हणून प्राचीन भारताला सम्राट अशोकामुळे
” भारत सोने की चिडिया” किंवा” सोन्याचा धूर भारतातून निघत होता” असे लोक आजही
अभिमानाने
म्हणतात…
▪️सम्राट अशोक वयाच्या २१ व्या वर्षी मगधच्या
गादीवर बसला.
आपला राज्याभिषेक करून संपूर्ण भारतदेशाचा
अनभिषीज्ञ सम्राट बनला…
आता सम्राट अशोक चक्रवर्ती बनला होता.
एका मागून एक राज्ये अशोकाला शरण येऊ लागली
पण कलिंग देशाचा राजा चैत्र काही शरण येत नव्हता.
म्हणून सम्राट अशोकाने कलिंग देशावर युद्ध पुकारले ,
युद्धात लाखो माणसे मारली गेली .
लाखो लोक जखमी झाले.
हे भयानक चित्र पाहून अशोकाला कसलीच दया आली नाही आणि भीती वाटली नाही.
विजयाने बेभान होऊन सम्राट अशोक नाचत होता…
त्याचवेळी भन्ते निग्रोध चारीकेसाठी चालले होते.
“बुद्धं सरणं गच्छामी”चा निनाद सम्राट अशोकाच्या कानावर पडला.
अशोक म्हणतो,
“या भन्ते, आपले स्वागत असो
आपण वेळेवर आलात.
मला आशीर्वाद द्यावा, मी आता सम्राट
झालो…”
त्यावर भन्ते म्हणाले ,
“यात तू कसला आलास सम्राट..?
तू लाखो जीव हत्येचे पाप केले आहेस.
हे सारे कशासाठी ?
तृष्णेपोटीच ना..?
यात जनहित मुळीच नाही
या लोकांचा आक्रोश तुला ऐकू येतो ना. हे सारे तुझ्याचमुळे झाले ,
असे दुष्कर्म तू केलेले आहेस.”
पुढे भन्ते तथागताचा मैत्री, अहिंसा तत्वाचा उपदेश
अशोकाला करतात…
अशोकामध्ये बदल होऊन हाती असलेली तलवार
सम्राट अशोक म्यान करतात आणि म्हणतो,
“मी आजपासून शस्त्र हातात घेणार नाही. युद्ध करणार नाही,
आजपासून धम्मशील होणार ,
मी बुद्धधम्माला शरण जाणार.”
तेव्हा अशोकाने बौद्ध धम्माचा स्वीकार करून भन्ते उपगुप्त यांच्या हस्ते बौद्ध धम्माची दीक्षा
घेतली…
तेव्हापासून बौद्ध धम्म आचारसंहितेवर आधारलेला ‘दसहारा’ नावाचा अधिकृत जाहीरनामा बनवून,
त्यात आचरणाचे दहा तत्वे समाविष्ट करून असोकविजयादशमी,
दसहारा म्हणजेच कालांतराने दसरा सण साजरा करण्यात येऊ लागला…
सम्राट अशोकाने प्रजेला प्रजाधर्म आणि राजधर्म म्हणून बौद्ध धम्म दिला , अनेक भिक्खूना परदेशात पाठविले ,अनेक लेण्या, स्तंभ उभारले . ८४००० स्तूप बांधले.
लाखो करोडो लोकांना बौद्धधम्माची दीक्षा दिली…
अशा या महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या २३२८ व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत