जन आरोग्य योजनेतून राज्यातील ६४१ रुग्णालये आऊट.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या रुग्णावर दीड लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादित मोफत उपचार करण्यासाठी अमलात आणलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी राज्यातील तब्बल ६४१ रुग्णालयांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत दुर्बल व्यक्तींना दीड लाख रुपयेपर्यंतचे विमा कवच होते. याचा गैरफायदा घेत राज्यातील ६४१ रुग्णालयांनी या योजनेच्या लाभासह रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनाही लुबाडले. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून येणाऱ्या तक्रारीचा विचार करून व त्यांच्या आरोपाची शहानिशा करत या विभागांनी चौकशी केली होती. या चौकशीत ९५८ रुग्णालय पैकी ६४१ रुग्णालयेदोषी आढळल्याने त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. या रुग्णालयांच्या व्यवस्थापनावर शासनाने अपहार झालेल्या रकमेची वसुली प्रक्रिया चालू असून, काही रुग्णालांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे तत्कालीन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने २०१३ मध्ये ही होते. योजना संपूर्ण राज्यात लागू केलीहोती. २०१४ मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर या योजनेचे नाव बदलून महात्मा फुले जन आरोग्य योजना असे करण्यात आले होते. या योजनेत आज घडीला सव्वा दोन ते अडीच कोटी कुटुंबाची नोंदणी आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील पिवळे, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा योजनेतील रेशन कार्डधारक. शासकीय अनाथालयमधील मुले. शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी. शासकीय आश्रमातील महिला शासकीय वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक. महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत बांधकाम कामगार यांच्यासाठी ही योजना आहे. दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचार या योजनेत मोफत आहेत. प्रत्येक आजारासाठी शासनाने ठरवून दिलेले खर्चाचे पॅकेज आहे.
या योजनेत संबंधित रुग्णाला बसवल्यानंतरही रुग्णाकडून जादा रक्कम उकळणे, जेवढे उपचार केले आहेत त्यापेक्षा अधिक उपचारांचे क्लेम दाखल करणे. एखादा रुग्ण या जन आरोग्य योजनेस पात्र असतानाही योजनेतून लाभ देण्यास नकार देणे, प्रत्यक्षात रुग्णांचा आजार एक योजनेत दुसराच आजार दाखवणे, रुग्णांना अंधारात ठेवून सर्व उपचार योजनेत बसवणे, याशिवाय रुग्णाकडून पूर्ण रक्कम घेऊनही या योजनेतूनही पैसे लाटणे, नियोजित वेळेत उपचाराच्या रकमांचे क्लेम दाखल न करणे, या व इतर कारणांमुळे या ६४१ रुग्णालयांना बाहेर काढले आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत