
ज्येष्ठ खेळाडूंनी माय भारत पोर्टलवर स्वयंसेवक म्हणून नोंदणी करावी व युवा खेळाडूंनाही या मंचावर नोंदणी करण्यास प्रोत्साहित करावे असे ठाकूर म्हणाले. देशाचा क्रीडा क्षेत्रातला स्तर उंचावण्यासाठी नामांकित खेळाडूंनी पुढाकार घ्यावा असे आवाहन युवा कल्याण आणि क्रीडामंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी केलं आहे. ते काल बंगळुरू इथं एका कार्यक्रमात बोलत होते. देशाच्या कुठल्याही भागातल्या युवा खेळाडूच्या त्या खेळातल्या प्रावीण्याची ध्वनीचित्रफीत या मंचावर कोणालाही पाठवता येईल. अशा खेळाडूंच्या प्रशिक्षणाची व्यवस्था सरकार करेल असं सांगून नामांकित खेळाडूंनी आठवड्यातून किमान दोन तास युवा पिढीला प्रशिक्षण द्यावं असं आवाहनही त्यांनी केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत