निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर

लोकसभा 2024 च्या रिंगणात महाराष्ट्रातील सर्वात जास्त चर्चेत असलेला निर्णायक पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सूचित केल्याप्रमाणे मुंबई व कांहीं ठिकाणीं वांचित ने उमेदवार उशिराने जाहीर करण्याची भूमिका घेतली आहे. येत्या 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात होणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर विविध उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या जात आहेत.

वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात वंचित बहुजन आघाडीकडून 10 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने रायगड, उस्मानाबाद, जळगाव, पालघर, भिवंडी आणि मुंबईतील तीन मतदारसंघांचा समावेश आहे. 

यावेळेस वंचित बहुजन आघाडी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सर्व लहान सहान बाबी विचारात घेऊन रणनीती आखत आहे त्यामुळे सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!