धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी (शरद पवार) च्या वाटेवर; 14 एप्रिल ला करणार पक्ष प्रवेश

लोकसभा निवडणूक 2024 तोंडावर भाजप चे मनपूर्वक आभार मानत नुकताच पक्ष आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून त्यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती आहे.
14 एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये अधिकृत पक्षप्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मातब्बर राजकारणी अशी ओळख असणाऱ्या शरद पवार यांनीही राजकीय डावपेच साधत आता आपल्या गटाची ताकद वाढवल्याचं पाहायला मिळत आहे. पवारांच्या साथीला आता माढा मतदारसंघही येण्याची चिन्हं आहेत. कारण, त्यांच्या गटाशी आता धैर्यशील मोहिते पाटील हे नाव जोडलं जाणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत