महाराष्ट्रमुख्य पानमुख्यपानशैक्षणिक

एमपीएससीकडून २०२१ च्या ‘पीएसआय’ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ या परीक्षेतील पोलिस उपनिरीक्षक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.

अनाथ आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार अनाथ दोन पदे या जाहिरातीमध्ये समाविष्ट करून ३७८ पदांसाठीही सर्वसाधारण गुणवत्ता यादी आहे.

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. ही गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची असून, विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये, शिफारसींमध्ये बदल होऊ शकतो. खेळाडू प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची क्रीडाविषयक प्रमाणपत्रे प्राधिकृत क्रीडा अधिकाऱ्यांनी तपासणाच्या अटीच्या अधीन राहून त्यांचा खेळाडू प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरून त्यांचा समावेश तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये करण्यात आला आहे, असे एमपीएससीकडून नमूद करण्यात आले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!