आर्थिकमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

आर्थिक वर्षाची सुरुवात किंमत वाढीने ..

महाराष्ट्रात पेट्रोल 65 पैशांनी तर डिझेल 63 पैशांनी महाग.

आजपासून आर्थिक वर्षाला सुरुवात होत असून शासनाच्या वतीने वस्तू व करांच्या बऱ्याच नियमात बदल केला आहे. जसे की, एलपीजी गॅस सिलेंडरचे दर, टॅक्स नियमात बदल, फास्टॅग यांसारख्या नियमात बदल इत्यादी.

यंदा एलपीजी गॅस दरवाढीपासून सर्वसाम्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु इतर गोष्टींमध्ये मात्र महागाईच्या झळा सोसावे लागणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ही काहीसा बदल दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किचिंत बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या दरात चढ-उतार होत असून सरकारी कंपन्यांनी आज म्हणजेच 1 एप्रिल 2024 साठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर केल्या आहेत. आज देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहेत. तसेच आज WTI क्रूड प्रति बॅरल $ 83.17 वर विकले जाणार आहेत. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $86.97 वर व्यापार करत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 रुपयांनी कपात केल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळाला आहे. मात्र आज (1st April) महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल महाग झाले आहे. आज महाराष्ट्रात पेट्रोल 65 पैशांनी तर डिझेल 63 पैशांनी महाग झाले आहे. तर मध्य प्रदेशात पेट्रोल 31 पैसे तर डिझेल 28 पैसे महागले आहे. हिमाचल प्रदेशात पेट्रोल 23 पैसे तर डिझेल 22 पैशांनी महागले. 

महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर

आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत आज पेट्रोल दर प्रतिलिटर 104.21 रुपये तर डिझेलचा दर 92.15 रुपये प्रतिलिटरने विकले जाणार आहे. तर पुण्यात पेट्रोलचा दर 103.83 रुपये तर डिझेलचा दर 90.37 रुपये आहे. आज नाशिकमध्ये पेट्रोल 104.91 रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे. डिझेलचे दर 91. ते 41 रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर 103.98 रुपये तर डिझेलचा दर 90.54 रुपये प्रतिलिटर आहे. छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल 106. ते 78 रुपयांना विकले गेले असते. डिझेल 90.54 रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध आहे. त्याचबरोबर आज नवी दिल्लीत पेट्रोलचा दर 94.72 रुपये प्रतिलिटर आहे. डिझेलचा दर 87.62 रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 103.94 रुपये आणि डिझेलचा दर 90.76 रुपये आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 100.75 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 92.34 रुपये प्रति लिटर आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!