मराठा सामाज्याकडून लाटी चार्ज च्या निषेधार्त आज सांगली बंद.

जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. राज्यभरात याचे पडसाद उमटत असून जालन्यातील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज सांगली बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा समाजाने हा निर्णय घेत ७ सप्टेंबरला संपूर्ण जिल्हा बंद ठेवण्यात आला आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातून जाणारे सर्व राज्यमार्ग त्याचबरोबर पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर देखील रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सांगली मधील मराठा सेवा संघाच्या कार्यालयामध्ये आज जिल्ह्यातील मराठा समाजाची बैठक झाली. यात ११ सप्टेंबरला मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या मोर्चापूर्वी ७ सप्टेंबरला सांगली जिल्हा बंदचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. जिल्हा बंद पाळण्यात येणार असल्याने ११ सप्टेंबरचा मोर्चा तूर्त स्थगित करण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत