“माझं काम मी केलं” – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

कविता – माझं काम मी केलं…..
(या कवितेतून डॉ. बाबासाहेब म्हणतायत…)
माझं काम मी केलं
तुम्हाला नवजीवन दिलं
विश्व खुलं करून दिलं
आणि पंखांना बळ दिलं
आता मारा भरारी….
तुमच्यात हिंमत असेल तेव्हढी
मी जीवनाचं मूळ सूत्र या
संविधानात लिहून दिलं
माझं काम मी केलं
मला नव्हतं पाणी प्यायला
स्वच्छ मिळत
मला नव्हतं तुमच्यासारखं
सगळ्यांच्यात बसता येत होतं
मला नव्हता पलंग गादी…
एसीची हवा आणि विद्युत दिवा,
मला नव्हतं मनसोक्त हिंडता येत, होतं
मी ते मिळवलं… व
तुम्हाला मिळून दिलं,
माझं काम मी केलं…..
मान सन्मान इज्जत देत नव्हते मला
नव्हता माझ्यासाठी
कुणाचा दरवाजा खुला,
साधा चपराशी सुद्धा टाळायचा मला
ते जातीचं लेबल तुम्हाला काढून दिलं.
माझं काम मी केलं….
आणखीन खूप काय सांगायचं होतं
पण शरीर साथ देत नव्हतं…
तरी सुद्धा जितकं होईल तितकं
जगणं सोपं करून दिलं
आणि त्याहून सुंदर पुस्तकात लिहून दिलं,
माझं काम मी केलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत