प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

पवित्र रमजान ईदच्या शुभेच्छा देत गरजू बांधवांना सण साजरा करता यावा या उद्देशाने संभव फाउंडेशनच्या वतीने धान्य किटचे वाटप करण्यात आले.

सम्राट चौक परिसरातील जवळकर वस्ती येथील मुस्लिम बांधवांना सदर रेशन किटचे वाटप करण्यात आले. यावेळी
महाबोधी लेझींम संघाचे आधारस्तंभ अमोल दादा गोडसे व
बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजित गादेकर
यांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्ते विशाल बापु कांबळे,आयडल्स ग्रुपचे अध्यक्ष सुमित शिवशरण,शेरा तुळसे,विकी शेंडगे,संपत जेढिथोर,मंगेश कांबळे,श्रीशैल हिरेमठ,आदींची उपस्थिती होती.

किटमध्ये गहू,मसूर दाळ,तूरदाळ, तेल,चहापती,साखर,रवा, तांदूळ असे साहित्य आहे.

रमजान ईद निमित्त गोरगरीब परिवारामध्ये संभव फाउंडेशन तर्फे एक सामाजिक उपक्रम करून रमजान ईदच्या
उपस्थित असणाऱ्या भगिनींना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाची प्रस्तावना संभव फाउंडेशनचे अध्यक्ष आतिश सिरसट यांनी केली तर सुत्रसंचलन रामेश्वर इराबत्ती यांनी केलं तर आभारप्रदर्शन यासीन पटेल यांनी मानले.

रमजान च्या पवित्र महिन्यात संभव फाउंडेशन कडून रेशन किट मिळाल्याने परिसरात आनंदीमय वातावरण निर्माण झाले आहे.

आतिश कविता लक्ष्मण सिरसट
अध्यक्ष संभव फाउंडेशन, सोलापूर
९७६५०६५०९८

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!