भारताचे प्रमुख ख्रिश्चन धर्मगुरु कार्डिनल ग्रेशियस ओसवाल्ड यांची इस्टर सणा निमित्त बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली सदिच्छा भेट.

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. Balasaheb Ambedkar यांनी आज भारताचे प्रमुख ख्रिश्चन धर्मगुरु कार्डिनल ग्रेशियस ओसवाल्ड यांची इस्टर सणा निमित्त शुभेच्छा भेट घेतली. ख्रिस्ती समाजाच्या व्यथा, सामाजिक, धार्मिक हक्क व होणारे अन्याय, गरजा याबाबत विस्तृत चर्चा झाली असून यात ख्रिश्चन समाजाचे तरुण नेते लुकस उर्फ प्रशांत केदारी, सोन्याबापू वाघमारे, सँमसन फेबियन, अँड. अंतोन कदम, रतन ब्राम्हणे उपस्थित होते.
सदरची भेट ईस्टर सणाच्या शुभेच्छा याबाबतीत आयोजित करण्यात आली होती. बाळासाहेब आंबेडकर यांना पवित्र बायबल आणि कार्डीनल यांनी संस्थेचे मोमेन्टो भेट म्हणून दिले.
यावेळी लुकस केदारी यांनी बाळासाहेब आंबेडकर यांचा कार्डीनल ओसवाल्ड ग्रेशियस यांनी सत्कार केला. ओसवाल्ड साहेब यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना सदिच्छा दिल्या. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अबुल हसन खान उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत