आरोग्यविषयकनिवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

आता डॉक्टरही निवडणुकीच्या कामाला

मुंबई: निवडणुकांच्या गोंधळात मुलांच्या शिक्षणाचे नुकसान करत आजवर निवडणूक आयोग शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपत होता, आता मात्र आरोग्य सेवेमध्ये तत्पर असणाऱ्या डॉक्टरांना देखील निवडणुकीच्या कामाला लावले जाणार आहे.

निवडणूक कामातून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचा-यांना सूट असतानाही निवडणूक आयोगाने डॉक्टरांना निवडणूक डयुटीवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केईएम रूग्णालयातील 900 पैकी 600 नर्सेसना इलेक्शन ड्युटी लावण्यात आली आहे. यामुळे पालिकेच्या प्रमुख रूग्णालयातील आरोग्य सेवा ठप्प पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच डॉक्टरांना इलेक्शन ड्युटी लावली जाणार आहे. यामुळे रुग्ण सेवेची जबाबदारी असणाऱ्या डॉक्टरांना आता निवडणुकीचे अतिरीक्त काम करावे लागणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!