ॲड मा मा येवले नावाचा रिपब्लिकन झंझावात वयाच्या 87 व्या वर्षी बुद्ध-भीम चरणी झाला लिन….!

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते धम्म दीक्षा ग्रहण केलेले, दादासाहेब गायकवाड यांचे नजिकचे सहकारी, रिपाई चे राष्ट्रीय उपाध्यक्ष, दीक्षा भूमी नागपूर चे गव्हर्निंग बॉडी चे सन्माननीय सदस्य, २०१४ सालचा महाराष्ट्र शासनाचा “समाजभूषण” पुरस्कार प्राप्त भीम सैनिक, ॲड. माणिकराव माधवराव येवले यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे.
कालवश वेळ सकाळी 9.30 वाजता आणि अंत्ययात्रा दि. 27-03-2024 रोजी दुपारी 2.00 वाजता प्रज्ञा करुणा विहार देगांवचाळ नांदेड येथून निघेल. ही अंत्ययात्रा देगावचाळ, नल्लागुट्टाचाळ, एनटीसी मिल्स, कलामंदिर, वजिराबाद मार्गे प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन जिल्हाधिकारी कार्यालय, महाविर चौक, मुथा चौक वजिराबाद मार्गे पोलिस परेड ग्राऊंड मार्गे देगांवचाळ ते भीमघाट पर्यंत जाईल भीमघाट येथे गोदावरी नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
टीम दैनिक जागृत भारत च्या वतीने विनम्र अभिवादन व भावपूर्ण आदरांजली..!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत