लेखक साहित्यिक आयु. पंडित कांबळे यांच्या कवितासंग्रहाला नामांकित “नामदेव ढसाळ राज्यस्तरीय” पुरस्कार जाहीर.

नागपूर : जागतिक आंबेडकरवादी साहित्य मंडळ नागपूर तर्फे दिला जाणारा “नामदेव ढसाळ राज्यस्तरीय” पुरस्कार २०२४ या वर्षा साठी प्रतिभावान लेखक साहित्यिक आयु. पंडित कांबळे सर यांना जाहीर झाला आहे.
“पेटलेल्या शहराच्या कल्लोळात” या त्यांच्या कविता संग्रहा साठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
रविवार दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी जागतिक आंबेडकरवादी साहित्य मंडळाच्या दहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या उपस्थितीत भव्यदिव्य सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
साहित्य समूहातून तसेच आंबेडकरी चळवळीतील मान्यवर व समाज बांधवांकडून आयु. पंडित कांबळे यांच्यावर मंगल कामनांचा वर्षाव होत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत