डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राजर्षी शाहू महाराजांशी घनिष्ट संबंध

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राजर्षी शाहू महाराजांशी जो घनिष्ट संबंध आला,तो मार्च १९२० मध्ये कोल्हापूर संस्थानात माणगाव या ठिकाणी भरलेल्या परिषदेत. ही परिषद महाराजांच्या प्रेरणेनेच भरली होती आणि तिच्यासाठी खास सवड काढून महाराज परिषदेला उपस्थित राहिले होते. बाबासाहेब परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांच्या रूपाने अस्पृश्य समाजास एक उमदे नेतृत्व मिळत आहे, याचा महाराजांना मोठा आनंद झाला होता.
21 व 22 मार्च 1920 झालेल्या माणगाव येथील अस्पृश्याच्या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष स्थानी होते व ही परिषद लोक कल्याणकारी लोकशाही प्रीय आरक्षणाचे जनक असले छत्रपती शाहूमहाराज यांनी ही परिषद भरविली होती तेव्हा छत्रपती शाहूमहाराजांनी हे उद्गार काढले होते की *” डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रुपात अस्पृश्यांचे भले करणारा नेता मिळाला आहे व तोच तुमचा उध्धार करेल ” त्यामुळे बाबासाहेबांचा सन्मान वाढला *
*31 जानेवारी 1920 ला ” मुकनायक ” हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केले होते, त्यासाठीच छत्रपती शाहूमहाराज यांनी अर्थसहाय्य केले होते.
कैलास खिल्लारे मेजर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत