मोदीशाही हटाव, लोकशाही बचाव ; पनवेलमध्ये इंडिया आघाडीच्या वतीने निदर्शने…

पनवेल: मोठ्या संख्येने इंडिया आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. हुकूमशाही सरकारने सरकारला प्रश्न विचारले म्हणून 149 खासदारांचे निलंबन केल्याचा आरोप करत दि.22 रोजी पनवेल येथील शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भाजप सरकारचा जाहीर निषेध इंडिया आघाडीतर्फे करण्यात आला.
देशात भाजपच्या वतीने दडपशाही सुरु आहे.भारताच्या इतिहासात प्रथमच तब्बल 149 खासदारांना निलंबित केल्याची घटना घडत आहे. याविरोधात देशभरात आक्रोष आहे. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधारी भाजप कोणत्याही स्तरावर जात असल्याचा आरोप इंडिया आघाडीने करत पनवेल उरण मधील इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवाजी चौकात निदर्शन केली.
मोदीशाही हटाव लोकशाही बचाव अशा प्रकारची घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बबन पाटील, जिल्हा प्रमुख शिरीष घरत,माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, माजी नगरसेवक सतीश पाटील, काँग्रेसचे महेंद्र घरत,सुदाम पाटील, आर सी घरत, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील,माजी नगरसेविका निर्मला म्हात्रे, सुरेख मोहोकर, शेकापचे नारायण घरत, एकनाथ म्हात्रे, विश्वास पेटकर, अवचित राऊत आघाडीचे पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी भाजपाविरोधात घोषणा देण्यात आल्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत