
राजमुद्रेच्या आकारात या स्कंधभूषणात अशोक चिन्ह लावण्यात आलं आहे. या अष्टकोनाचा अर्थ सर्वसमावेशक दीर्घकालीन दृष्टीकोन असा आहे. नौदलानं आज एडमिरल आणि इतर अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांचे नवे स्कंधभूषण अर्थात गणवेशात खांद्यावरच्या पट्टीवर लावायचे मानचिन्ह प्रसिद्ध केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपासून याची प्रेरणा घेतली आहे. गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्ती म्हणून यात सोनेरी बटनावर नौदलाचा लोगो लावला आहे. यासह तलवार आणि दुर्बिणही यावर आहे. मालवणमध्ये ४ डिसेंबरला झालेल्या नौदल दिनाच्या कार्यक्रमात यासंदर्भातली घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली होती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत