मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

मराठा समाज आता निवडणुकीच्या आखाड्यात

मराठा आरक्षणासाठी लढणारा मराठा समाज आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मराठा समाज  प्रत्येक गावातून 2 उमेदवार उभे करणार आहे. मराठा समाजाकडून 1 हजार उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून निवडणुक लढवणाऱ्या उमेदवारांना याचा फटका बसू शकतो. 

धाराशिवमधी लोकसभेची निवडणूक प्रशासनासाठीच आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. धाराशिवमध्ये मराठा समाजाकडून 1 हजार उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. प्रत्येक गावातून दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आलीये. या उमेदवारांच्या अनामत रकमेसाठी प्रत्येक मराठा कुटुंबाकडून 100 रुपये देणगी दिली जाणार आहे. आतापर्यंत 50 जणांची उमेदवारी निश्चितही करण्यात आलीय. दरम्यान याबाबत 24 मार्चला अंतरवाली सराटीत बैठक होईल. त्यात उमेदवारांबाबत पुढील दिशा ठरवली जाईल. दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाल्यास प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे.

मराठा आरक्षणासाठी सरकार ने सगेसोयरे अधिसूचने चे पालन न केल्याचा निषेधार्थ मराठा समाजाकडून आगामी धाराशिव लोकसभा निवडणुकीसाठी एक हजार उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी सकल मराठा समाजाने केली आहे. धाराशिव लोकसभा मतदार संघात येणाऱ्या प्रत्येक गावातून प्रत्येकी दोन उमेदवार देण्याचा निर्णय झाला आहे. अनामत रक्कम भरण्यासाठी मराठा कुटुंबांकडून प्रत्येकी शंभर रुपयाची वर्गणी गोळा केली जाणार आहे. पत्रकार परिषदेमध्ये सकल मराठा आंदोलकांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान लोकसभा मतदारसंघातील दहाही तालुक्यातील अर्ज भरून घेतले जात आहेत. आत्तापर्यंत 50 जणांची उमेदवारी जाहीर देखील करण्यात आली आहे. 

मनोज जरांगेंनी लोकसभेची निवडणूक लढवावी; प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला

मनोज जरांगेंनी लोकसभेची निवडणूक लढवावी असा सल्ला वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. लोकसभेत गेल्यानंतरच प्रश्न सुटतात, कायदेशीर मार्गानं प्रश्न सोडवायचे असतील तर लोकसभा निवडणुकीबाबत जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी असंही आंबेडकरांनी म्हंटल होत. 

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!