चळवळ खरी कुणालाच का बरं कळली नाही !?

भडव्यांनी दलाली आजवरही सोडली नाही..
चळवळ खरी कुणालाच का बरं कळली नाही..”ध्रु”
सत्ता आणि राजकारण यातच आम्ही गुरफटलो
विचारा पासुन काधीचेच सारे आम्ही भरकटलो
स्वार्थापायी समाजाची कुणी व्यथा जाणली नाही..
चळवळ खरी कुणालाच का बरं कळली नाही..”१”
विचारावर जो ठाम असतो त्याला आमचा विरोध
तळवे चाटनारे आम्ही डोक्यावर घेतो दरोज..
स्वाभिमानाशी नाळ काही आमची अजुन जुळली नाही..
चळवळ खरी कुणालाच का बरं कळली नाही..”२”
स्वतःच घर दिलं सोडुन राखण दुसऱ्याच्या वसरीवर
आम्ही फक्त रखवालदार आमची जागा सतरंजीवर
गुलामीची या लाज आम्हाला कधीच का वाटली नाही
चळवळ खरी कुणालाच का बरं कळली नाही..”३”
याच्या त्याच्या मागे आम्ही पत्करली लाचारी
इज्जत काहीच नसते आमची आम्ही विचाराने भिकारी
एकमेकांच्या द्वेष करीत कधी आपसी पटली नाही
चळवळ खरी कुणालाच का बरं कळली नाही..”४”
कवी..अभिजीत..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत