महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणसामाजिक / सांस्कृतिक

प्रबोधन व समाज सेवेसाठी कार्यरत असलेल्या आयु. जे टी जाधव यांचा शासनाकडून सन्मान

मुंबई : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक, साहित्यिक, दलित पँथर चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, शिक्षक संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, आण्णा भाऊ साठे साहित्य अभ्यासक व भाष्यकार, ७२ वर्षाचे आसूनही तरूण पिढीला लाजवेल असे काम करणारे, विविध सामाजिक संघटना व ट्रस्ट च्या संचालक पदावर कार्यरत असलेले आयु. माननीय जे टी जाधव सर यांचा महाराष्ट्र राज्य शासनाकडून शाल, सन्मान पत्र व पंचीवीस हजार रुपयांचा धनादेश देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

मुंबई येथील जमशेद भाभा नाट्यगृहात १२ मार्च २०२४ रोजी मा मुख्यमंत्री; समाज कल्याण सचिव; समाज कल्याण आयुक्त यांचे शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.

देशभरातील सर्व पँथर्सना या गोष्टीचा अभिमान व आनंद वाटतो. विशेष असे की यासाठी त्यांना कोणाचे पद ; प्रतिष्ठा व पैसा याचा वापर करावा लागला नाही किंबहुना असा मार्गही त्यांना पसंद नव्हता व आजही नाही.
उभे आयुष्य निःस्वार्थ समाजाची सेवा केली त्याचे या पुरस्काराने चीज झाले. उशिराने का होईना न्याय मिळाला व सन्मान झाला याचा आनंद आहे.

त्यानी भ्रष्टचार विरोधी मा आणा हजारे यांचे बरोबर काम केले. हाच बाणा कायम ठेवला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. दिवंगत नरेंद्र दाभोलकर यांचे बरोबर अंध श्रद्धा निर्मूलनाचे कार्य केले ते स्वतः ही असेच वागतात व जगतात हे विशेष.

सुमारे २५ वर्षे पत्रकारिता करूनही आजही ते निष्कलंक आहेत त्यांनी आपली लेखणी कधी विकली नाही वा कधी गैरवापर केला नाही म्हणून त्यांचा सन्मान पुरस्कार व सत्कार केला गेला असेच वाटते.

आज काल असा सन्मान मिळविण्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागते हे सर्व जण जाणता !म्हणून जाधव यांचा शासनाकडून झालेला सन्मान महत्वाचा आहे.

खरे तर जाधव सर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे शिकत असताना अजिंक्य पैलवान होते तेथेही सर्व कांहीं मेहनतीने मिळाले आजचा सन्मानही समाज समाजसेवा करूनच मिळविला. आजही ते दलित पँथर महाराष्ट्र राज्य चे उपाध्यक्ष म्हणून समाजसेवा करीत आहेत ; ते शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य म्हणून शैक्षणिक प्रश्न सोडविण्यात अग्रेसर आहेत ते ७२ वर्षाचे आसूनही तरूण पिढीला लाजवेल असे काम करतात ; ते आण्णा भाऊ साठे साहित्य अभ्यासक व भाष्यकार आहेत अनेक संघटना व ट्रस्ट चे संचालक आहेत त्यांचे जीवन समृध्द आहे त्यांना आमचे दलित पँथर महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन –

अंबादास शिंदे
संस्थापक अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य दलित पँथर.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!