महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

ज. वि. पवार यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन


सध्या भारत देशात संघ की संविधान हा प्रश्न ऐरणीवर आला असताना, भारतीय संविधानाबद्दल मोठ्या प्रमाणावर बोलले/लिहिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून संविधान प्रेमी ज. वि. पवार यांच्या ‘भारतीय संविधानाची ओळख’ या ग्रंथाचे प्रकाशन सिद्धार्थ महाविद्यालयाचे माजी ग्रंथालय प्रमुख मा. श्रीकांत तळवटकर यांच्या हस्ते दि. १५ मार्च २०२४ रोजी आंबेडकर भवन, दादर येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी अपरांत कला प्रबोधिनी चे कार्याध्यक्ष प्रा. आनंद देवडेकर, ब्लॅक लिटरेचर चे अभ्यासक डॉ. श्रीधर पवार, सुनील हेटकर, प्रा. विजय मोहिते, डॉ. संजय खैरे, पत्रकार दीपक पवार, रमाकांत जाधव सुबोध मोरे, अशोक चाफे, छनक शिर्के व अपरांत कला प्रबोधनीचे रायगड जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते हजर होते.
या ग्रंथात भारतीय संविधानाची महती पवार यांनी लिहिली असून आजच्या स्फोटक परिस्थितीवर भाष्य करणारी आहे. याच वेळी ज. वि. पवार लिखित ‘माजी आमदार भैय्यासाहेब आंबेडकर’ या ग्रंथाचे सुद्धा प्रकाशन करण्यात आले

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!