शरद पवार यांचे छायाचित्र, नावाचा वापर करणार नाही असे बिनशर्त शपथपत्र देण्याचे आदेश.. निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाची चपराक.

नवी दिल्ली : शरद पवार यांनी उभा केलेल्या पक्षातून आपण वेगळे झालेलो आहोत तर त्यांच्या पक्षाचे चिन्ह व त्यांचा फोटो का वापरता अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला गुरुवारी खडसावले.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर निर्णय होईपर्यंत घड्याळ ऐवजी दुसऱे चिन्ह वापरा अशा तोंडी सूचनाही न्यायालयाने केल्या. या संदर्भातला सर्वोच्च न्यायालयाचा लेखी आदेश मंगळवारी येण्याची शक्यता आहे.
शरद पवार यांचे छायाचित्र किंवा नावाचा वापर करणार नाही असे बिनशर्त प्रतिज्ञापत्र शनिवार पर्यंत देण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठांसमोर गुरुवारी सुनावणी झाली. तुम्ही शरद पवारांपासून वेगळे होणे निवडले आहे, आता त्या निर्णयाशी तुम्ही ठाम राहा असे परखड मत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत