महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणसामाजिक / सांस्कृतिक

मागासवर्गी्यांचे अनुशेष भरा कल्याण मध्ये उपोषण

( राहुल हंडोरे यांजकडून )

कल्याण दि.13 मार्च
शासकीय विभाग व शासन नियंत्रित सर्व आस्थापनातील मागासवर्गीय ( अनुसूचित जाती जमाती, अल्पसंख्यांक, बुद्धिस्ट ) समाजातील शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे अनुशेष भरण्यात यावेत या करिता पत्रकार सुभाषचंद्र बोराडे हे कल्याण येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बेमुदत उपोषणास बसले आहेत.

पूर्वी प्रमाणे सेवानियोजन कार्यालये सुरु करण्यात यावेत, पदोन्नतील आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, कॉन्ट्रॅक्ट पद्धत रद्द करण्यात यावी आदि मागण्यासाठी पत्रकार सुभाषचंद्र बोराडे हे उपोषणास बसले आहेत.

डॉ बी आर आंबेडकर प्रतिष्ठान अध्यक्ष राहुल हंडोरे, महिला प्रतिष्ठान अध्यक्षा कुसुम गौतम, सचिव करुणा कातखडे आदींनी उपोषण स्थळाला भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!