मतदान करण्याच्या सर्वोच्च नागरी अधिकाराला संरक्षण मिळणे बाबत..!

प्रती,
मा.सरन्यायाधीश साहेब
सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया,
टिळक मार्ग,
नवी दिल्ली-110001
विषय- आगामी लोकसभेच्या निवडणुका evm मशीन ने न घेता बायलट पेपर वर घेण्याबाबत.
संदर्भ- मतदान करण्याचा सर्वोच्च अधिकार भारतीय संविधानाने दिल्यामुळे माझ्या नागरी अधिकाराला संरक्षण मिळण्या संदर्भात…
आदरणीय महोदय,
मी स्वतंत्र भारताचा स्वतंत्र नागरिक असून,भारतीय लोकशाहीवर माझी प्रचंड निष्ठा आहे.मात्र एवं मशीनवर मतदान केल्याने मतांची मोठ्या प्रमाणात चोरी होऊन मतदारांना नको असलेल्या उमेदवाराला मते जाऊन तो उमेदवार मतदारांवर लादल्या जात असल्याची मोठ्या प्रमाणात देशात चर्चा सुरु झाली आहे.त्यामुळे भारतीय नागरिक म्हणून मला मिळालेला मतदानाच्या अधिकारावरच घाव घातल्या जात असेल,आणी या evm मशीन मुळे माझे गुप्त मतदानाच चोरीला जात असेल तर हा प्रकार भारतीय संविधानाने दिलेल्या नागरी अधिकारांचे हनन आहे,असे मला वाटते.आणी नागरी अधिकारांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे…जगात जवळपास सर्वच प्रगत देशांनी evm मशीनवर बंदी आणली असून,या मशीन द्वारे मतदानाची चोरी करता येऊ शकत असल्याची बाब देश-विदेशातील अनेक विद्वांनानी अनेकदा स्पष्ट केली आहे.
कृपया माझे नागरी अधिकार सुरक्षित आणी आबाधित राखण्यासाठी आगामी लोकसभेची निवडणूक ही evm मशीन द्वारे न घेता बायलट पेपर द्वारा घेण्या बाबत आपण निवडणूक आयोगाची कान उघडणी करावी.जेणेकरून सर्वसामान्य मतदारांचा भारतीय लोकशाही वरील विश्वास कायम राहील.
स्वतंत्र भारताच्या नागरिकांचे नगरी अधिकार शाबूत ठेवण्यासाठी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ आणी पुरोगामी साहित्य संसद महाराष्ट्र, या संघटनानी आपल्याला evm हटविण्या बाबत पाठविण्यात येणाऱ्या विनंती पत्राच्या मोहिमेत सहभागी होत असून,सर्व सामान्य मतदारांच्या भावना लक्षात घेता भारतीय निवडणूक आयोगाला आदेश देऊन एवं मशीनवर बंदी घालून आगामी निवडणुका बायलट पेपर वर घेण्यास आदेश द्यावा,ही विनंती…
आपला विनम्र नागरिक
नरेंद्र सोनारकर
महाराष्ट्र राज्य संघटक- राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ,
महाराष्ट्र अध्यक्ष- पुरोगामी साहित्य संसद,महाराष्ट्र.
— ———- ——-
टिप-स्वतंत्र भारताचे जबाबदार नागरिक म्हणून या पोस्ट चा मायना हिंदी/इंग्रजी भाषेत करून सुप्रीम कोर्टाला पाठवा.फक्त 5 रुपयांचा लिफाफा लागेल.लोकशाही वाचवण्यासाठी काय आपण 5 रुपये खर्च करू शकत नाही ?
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत