” आंबेडकरी समाजाची माफी मागा अन्यथा तोंडाला काळे फासणार ..!” भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संजय रणदिवे यांचा लक्ष्मण ढोबळे यांना इशारा.

महार हे दलित अल्पसंख्यांक आहेत असे वादग्रस्त वक्तव्य करणारे लक्ष्मण ढोबळे यांनी तात्काळ आंबेडकर जनतेची माफी मागावी अन्यथा समाजात कुठेही आणि कधीही त्यांच्या तोंडाला काळी फासण्यात येईल तसेच जातीबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेने केली आहे.
लक्ष्मण ढोबळे यांनी हिंदू दलित ही नवीन व्याख्या काढली असून या व्याख्याची फोड करताना ढोबळे म्हणाले हिंदू दलित या व्याख्यात महार जातीचा समावेश होत नाही महार समाज अल्पसंख्यांक असून हिंदू दलितांमध्ये मातंग ही सर्वात मोठी जात असल्याचा दावा ढोबळे यांनी केला आणि सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातून हिंदू दलित या व्याख्या खाली मला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. म्हणजेच लक्ष्मण ढोबळे हे थेट महार समाजाला विरोध करत आहेत, त्यांचे जातीवादी बोलणे आणि महार समाजाला विरोध करणे आंबेडकरी जनता खपवून घेणार नाही असेही यावेळी संजय रणदिवे यांनी म्हणले.
ढोबळे यांची प्रगती कशामुळे झाली हे ढोबळे यांनी विसरू नये, स्वतःला उच्चशिक्षित समजणारे ढोबळे यांनी आंबेडकरी चळवळीला कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर ढोबळे यांना त्यांची जागा दाखवली जाईल. लक्ष्मण ढोबळे यांनी अगोदर स्वतःची लायकी कोणामुळे वाढली याचा विचार करावा. डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाचा सर्वात मोठा लाभधारक लक्ष्मण ढोबळे आहेत यांनी महार जाती बद्दल बोलू नये अशी संतप्त प्रतिक्रिया संजय रणदिवे यांनी व्यक्त केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत