नोकरीविषयकमहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

MPSC परीक्षेमध्ये आता मुलाखतीच्या वेळी घेतली जाणार वैद्याकीय चाचणी

राज्यसेवा मुख्य परीक्षेद्वारे मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची वैद्याकीय तपासणीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करून वैद्याकीय तपासणी मुलाखतीच्या टप्प्यावर आयोजित करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला होता. सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्य सेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेतून शिफारस झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीच्या वेळी वैद्याकीय तपासणीमध्ये उमेदवार शिफारसपात्र पदासाठी अपात्र ठरल्यास उमेदवाराची अन्य पदावर निवड होऊ शकत नसल्याचे समोर येत होते. त्याचप्रमाणे अन्य पदासाठी आवश्यक गुण असूनही उमेदवार निवड प्रक्रियेतून बाद ठरत असल्याचे गेल्या काही वर्षांत स्पष्ट झाले होते. या पार्श्वभूमीवर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्याकीय चाचणी आणि उमेदवारांच्या निवडीसंदर्भातील कार्यपद्धत बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात मुलाखतीसाठी निवडलेल्या सर्व उमेदवारांची वैद्याकीय चाचणी करून वैद्याकीय पात्रतेच्या आधारे शिफारसपात्र उमेदवारांची निवडयादी तयार करण्यात येणार आहे.

हा निर्णय राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२पासून लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता हा निर्णय राज्यसेवा परीक्षा २०२२ ऐवजी राज्यसेवा परीक्षा २०२३पासून लागू करण्यात येणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!