विश्वव्यापक बुद्ध धम्म


१) तथागत बुद्धांनी निर्माण केलेला धम्म इ.स.पूर्व ५२८ ला आषाढी पौर्णिमेला सारनाथ येथे जन्मला आला. कौण्डिन्य, भद्रीय, वप्प, महानाम, अश्वजीत या पाच परिव्राजकांना प्रथम उपदेश करताना तो तीन टप्प्यांमध्ये सांगितला आहे. तथागत बुद्धांनी कोणताही काल्पनिक धर्म पंथ किंवा संप्रदाय स्थापन केलेला नसून माणसाने माणसाशी कसे वागावे, माणसाने जीवन जगत असताना चांगले जीवन कसे जगावे, व शेवटी मृत्यू समयी काय करावे याची शिकवण देणारा उद्देश केला. धम्म हे मानवी जीवनाच्या नियमाचे तत्त्व आहे.
➻ आदर्श जीवन शैलीचे पालन कसे करायचे, कोणत्या तरी व्यक्तीच्या आश्रयाने राहण्यापेक्षा धम्माच्या आश्रयाने राहणे योग्य असा निर्णय तथागत बुद्धांनी घेतला, त्याचा आदर्श समाजाला दिला. कायेच्या शुद्धी पेक्षा मनाची शुद्धी केल्याशिवाय परमसुख म्हणजे निर्वाणाची अवस्था प्राप्त होत नाही असा आणि नीतीमय धम्ममार्ग तथागत बुद्धांनी दाखवलेला आहे. या धम्ममार्गाचे पंचशील अष्टशील, दसशील टप्पे आहेत, तथागत बुद्धांनी याला विशुद्ध मार्ग असे म्हटले आहे, मानवाच्या कल्याणासाठी जो उपदेश केला, शिकवण दिली त्यालाच धम्म असे म्हणतात. धम्म म्हणजे माणसाने माणसाशी माणुसकीने वागण्याची आचारसहिता होय. धम्म सदाचार नीति होय.
➻२) तथागत बुद्धांनी मानवाच्या कल्याणासाठी, विश्वशांतीसाठी, सुखासाठी धम्माचा उपदेश दिला तो उपदेश जगाचे आकर्षण ठरला म्हणूनच तथागत बुद्धांना आशिया खंडाचा दिप असे संबोधले जाते. बुद्ध पूजेमध्ये सर्वत्र तेजस्वी, प्रखर प्रकाश देणारा दिप प्रतीक म्हणून संबोधले जाते. बुद्ध पूजेमध्ये प्रज्वलित केलेली मेणबत्ती अत्त दीप भव म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा. आपणच आपला मार्ग दिप व्हा असा संदेश देते.
➻ तथागत बुद्धांच्या महान शिकवणीने जगातील दुःख, अज्ञान, अंधकार नष्ट करून दुःख मुक्त केले. तथागत बुद्धांचा धम्म मानवाच्या बुद्धीला आवाहन करतो, म्हणून संपूर्ण जगभर धम्म पसरला. चीन, जपान, अमेरिका, इंग्लंड, थायलंड, सिंगापूर व ब्रह्मदेश अशा प्रगत व विकसित देशात तथागत बुद्धांचा धम्म चांगल्या प्रकारे प्रभावी ठरला आहे, विज्ञान युगात टिकून आहे आणि वाढत आहे.
➻३) तथागत बुद्धांनी धम्माला विज्ञानाची जोड दिली आहे. अंधश्रद्धा सोडून दिल्याने विज्ञानाची प्रतिष्ठा वाढत जात आहे व धम्माची महती संपूर्ण विश्वाला पटू लागली आहे. अल्बर्ट आईन्स्टाईन, बट्रार्ड रसेल यांसारखे अनेक शास्त्रज्ञ तथागत बुद्धांना आणि त्यांच्या धम्माला आदर्श मानतात. तथागत बुद्ध म्हणतात जगातील सर्व वस्तू गतीशील आहेत, सर्व वस्तू अनित्य निर्मिती आहे, जन्म व मृत्यू हा त्यांचा स्वभाव गुण आहे.
➻ तथागत बुद्धांचे म्हणणे आहे तेच जीवशास्त्रज्ञ चार्लस डार्विन म्हणतात, सृष्टीतील बदल एकसारखे नाहीत, प्रत्येक जीव स्वतंत्र निसर्गतः निर्माण झाला आहे, जगातील सर्व वस्तू या बदलणाऱ्या असल्यामुळे वस्तूचे गुणधर्म स्थिर असू शकत नाही. त्याचा ईश्वराशी काही संबंध नाही. सर्व धर्म अनित्य आहे. या बुद्धांच्या सिध्दांतशी चार्लस डार्विन सहमत आहेत. तथागत बुद्धांनी आपल्या धर्माची मांडणी करताना बुद्धिप्रामाण्य, तर्कशुद्ध, विचारनिष्ठ व विज्ञाननिष्ठ स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि सामाजिक न्याय या कसोट्या नेहमी नजरेसमोर ठेवून धम्म उपदेश केला आहे.
➻४) ब्रिटिश दार्शनिक लॉर्ड रसेल यांनी म्हटले आहे, जर मला एकदा धर्म ऐकण्याची व स्वीकारण्याची संधी मिळाली तर मी सर्व प्रथम बौद्ध धम्म स्वीकारेन यावरून वैश्विकता व्यापून टाकण्याची ताकद तथागत बुद्धांच्या धम्मात दिसून येते. आता धर्माचा काळ संपला आहे त्यामुळे टिकेल तो केवळ बौद्धधम्म टिकेल असे प्रसिद्ध अनु शास्त्रज्ञ आईनस्टाईनचे वाक्य सूचक आहे.
➻ नवीन आव्हाने स्वीकारण्याची ताकत बौध्द धम्मात आहे, सत्याच्या कसोटीवर इतर धर्म पारखले असता ते धर्म कुचकामी असल्याची जाणीव होते. इतर कोणत्याही धर्मापेक्षा आधुनिक युगात बौद्ध धम्माची जास्त गरज आहे, कारण धर्माचे पालन करणाऱ्यांवर कधी संकट किंवा दुःख कोसळत नाही. विज्ञानाच्या आधारावर आपण धम्म समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु विज्ञानाच्या पलीकडे धम्म आहे, विज्ञान युगात जास्त आवश्यकता आहे, कारण म्हणजे मानवाची निसर्गनियमानुसार सामूहिक आचरण जीवन पद्धती आहे. म्हणून बौद्ध धम्म विश्वव्यापक धम्म आहे.
➻५) तथागत बुद्ध म्हणतात, कुशल कर्माने स्वतःचे कल्याण होईल व इतर प्राणीमात्रांचे कल्याण होते. अकुशल कर्माने स्वतःचे व दुसऱ्याचे अकल्याण होते. विज्ञानाचा वापर माणसाच्या कल्याणासाठी केला तर जगाचे कल्याण होईल, आणि जर विज्ञानाचा गैरवापर केला तर जगाचे अकल्याण होईल म्हणून युध्दाकडून बुद्धाकडे जाण्याचा मार्ग प्रत्येकाने स्वीकारला पाहिजे.
समाज माध्यमातून साभार….
धम्मस्थान स्तूप
सद्धम्म प्रचार केंद्र मालेगाव जिल्हा वाशीम.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत