आर्थिकमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

“सोने तारण कर्ज तात्काळ थांबवा” – RBI चे IIFL वित्त कंपनीला आदेश.

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या शिखर बँकेने IIFL या सोने गहाण ठेवून वित्त पुरवठा करणाऱ्या कंपनीला सोने कर्ज तत्काळ प्रभावानं रोखण्याचे आदेश आज दिले. चालू स्थितीत ग्राहकांना दिलेले सोने कर्ज व्यवहार इतर कंपनीला हस्तांतरीत करण्यावरही बंधन घालण्यात आले आहे. मात्र विद्यमान ग्राहकांकडून कर्जाचे हप्ते वसूल करता येतील, असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलंय. कर्ज मंजूर करताना सोन्याची शुद्धता, वजन यांच्यासह इतर अनेक गोष्टींमध्ये रिझर्व्ह बँकेला गंभीर फरक आढळला होता.

कर्ज आणि रक्कम याचं गुणोत्तर, नियामकीय बंधनांपेक्षा मोठ्या प्रमाणात कर्ज वितरण, लिलावासाठी योग्य प्रक्रियेचा अवलंब न करणं आणि ग्राहकांच्या खात्यावर आकारल्या जाणाऱ्या शुल्कात पारदर्शकतेचा अभाव असल्याचं निरीक्षण बँकेनं गेल्या वित्तीय वर्षाअखेर केलेल्या पाहणीत नोंदवलं होतं. त्यानंतरही या कंपनीनं फार सुधारणा केल्या नसल्यानं हे निर्बंध रिझर्व्ह बँकेनं लादले आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!