देश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयसामान्य ज्ञान

पाकिस्तान मध्ये सत्ता बदल..

पाकिस्तानमध्ये झालेल्या पंतप्रधानपदासाठीच्या निवडणुकीत शेहबाद शरीफ (Shehbaz Sharif) यांनी बाजी मारल्याची माहिती समोर आली आहे. शेहबाद शरीफ यांनी पीटीआयच्या उमर अयुब खान यांचा पराभव केला. शेहबाद शरीफ यांना 201 मतं मिळाली अन् त्यांनी 92 मतं मिळालेल्या उमर अयुब खान (Umar Ayub Khan) यांचा पराभव करत निवडणूक जिंकली आहे. पाकिस्तानमध्ये झालेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. इम्रान खान यांच्या समर्थनात उभ्या राहिलेल्या उमेदवारांना सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र, पीएमएल-एन आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीने युती सरकार स्थापन करण्यावर सहमती दर्शवली अन् इम्रान खान यांना मोठा धक्का बसला.

पीएमएल-एन आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीने युती केल्याने शहबाज शरीफ यांचा पंतप्रधान होण्याचा पर्याय खुला झाला होता. मात्र, दुसरीकडे इम्रान खान यांच्या समर्थनाने उमर अयुब खान यांनी देखील पंतप्रधानपदाचा अर्ज दाखल केला. त्यामुळे सभापती अयाज सादिक यांनी मतदान घेण्याचा कौल दिला. मतदान झाल्यावर शेहबाद शरीफ यांना 201 मतं मिळाली. तर उमर अयुब खान यांना फक्त 92 मतांवर समाधानी रहावं लागलं. त्यामुळे आता येत्या सोमवारी शेहबाद शरीफ पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजला (पीएमएल-एन) 75 जागा मिळाल्या. बिलावल झरदारी भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला 54 जागा मिळाल्या. मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट पाकिस्तान (MQM-P) ला 17 जागा मिळाल्या. उर्वरित 12 जागा इतर छोट्या पक्षांनी जिंकल्या. सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 265 पैकी 133 जागा जिंकाव्या लागतात.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!