दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानवातावरणविचारपीठशैक्षणिकसामान्य ज्ञान

विज्ञान दिनाच्या शुभेच्छा..

पायात काळा धागा बांधून त्याला fashion चं नाव देणाऱ्यांना पण विज्ञान दिनाच्या शुभेच्छा…
हातात कथेचा, परित्राणचा धागा बांधून काही गोष्टी चटकन नाही सुधारता येत वेळ लागतो म्हणत ढोंगीपणावर पांघरूण घालणाऱ्यांना पण विज्ञान दिनाच्या शुभेच्छा…
God bless U, Buddha bless U म्हणणाऱ्यांना पण विज्ञान दिनाच्या शुभेच्छा…
बाहेर मोठमोठ्या गप्पा ठोकून तब्येत खराब झाली तर दृष्ट काढणाऱ्यांना पण विज्ञान दिनाच्या शुभेच्छा…
दुसऱ्यांना खुप उपदेश देऊन स्वत:च्या लग्नात सगळ्या हौसी, नवसी, rituals, कर्मकांड, रूढी, परंपरा साजऱ्या करून घरच्यांमुळे करावं लागतं म्हणत, घरच्यांवर खापर फोडणाऱ्या अस्सल दांभिक लोकांना पण विज्ञान दिनाच्या शुभेच्छा…
सगळी कर्मकांड, रूढी, परंपरा मानून त्यांना विज्ञानाची झालर लावणाऱ्या झोलर संशोधकांना पण विज्ञान दिनाच्या शुभेच्छा…
स्वत:ला संविधानवादी, विज्ञानवादी, स्त्रीवादी म्हणून सोयीने कपाळात कुंकू भरणे, काळी माळ गळ्यात घालणे, (so called सवाष्णीचे सगळे प्रतीकं घालणे), स्वत:च्या बायकोला व्यक्तीस्वातंत्र्याचा आड घेऊन हे करू देणे, किंवा घरचे म्हणतात म्हणून करतो अशा psudo संविधानवादी, विज्ञानवादी लोकांना पण विज्ञान दिनाच्या शुभेच्छा…
लहान गोंडस बाळाला दृष्ट लागू नये म्हणून डोळ्यात, चेहऱ्यावर, शरीरावर काजळ लावून मुद्दाम विद्रूप करणाऱ्या आईवडीलांना पण विज्ञान दिनाच्या शुभेच्छा…
अभ्यास न करता exam च्या आधी मंदिरात जाणाऱ्यांना पण पण विज्ञान दिनाच्या शुभेच्छा…
Exam पास झाली, नोकरी लागली, कुठलं कार्य success झालं तर स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास न ठेवता मंदीरात जाऊन चढावा चढवणाऱ्यांना पण पण विज्ञान दिनाच्या शुभेच्छा…
मुलं होतं नसतील तर doctor कडे न जाता बुवा बापूकडे जाणाऱ्यांना तसेच मुलगी झाली तर आईला दोष देणाऱ्यांना पण विज्ञान दिनाच्या शुभेच्छा… (यांना तर विज्ञानाचं nobel द्यायला हवं आणि यांचे विज्ञानाचे classes लगेच सुरू करायला हवेत)
List बरीच मोठी आहे पण तुर्तास एवढचं… तरी या सगळ्या कट्टर विज्ञानवादी लोकांना विज्ञान दिनाच्या शुभेच्छा

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!