मुख्यपानराजकीय

फौजदारी कायद्यांमध्ये बदल करणारी तीन विधेयकं लोकसभेत मंजूर

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं की, दीडशे – दोनशे वर्ष जुन्या कायदे व्यवस्थेत बदल घडवून आणून वसाहतवादाच्या खुणा पुसून टाकण्याचं काम मोदी सरकारनं केलं आहे. फौजदारी कायद्यांमध्ये बदल करणारी तीन विधेयकं आज लोकसभेत बहुमतानं मंजूर झाली. भारतीय न्याय संहिता विधेयक २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता विधेयक २०२३, आणि भारतीय साक्ष्य विधेयक २०२३ या तीन विधेयकांतल्या तरतुदींची माहिती आणि वैशिष्ट्यं त्यांनी सभागृहापुढे मांडली. प्रचलित कायद्यांमधे केवळ शिक्षेची तरतूद असते, त्या तुलनेत नव्या कायद्यांची रचना मानवतावादी दृष्टिकोनातून करण्यात आली असून , महिला आणि बालकांच्या हक्कांना प्राधान्य देण्याच्या प्रयत्न सरकारनं या कायद्यांच्या माध्यमातून केला आहे असं ते म्हणाले. फौजदारी कारवाई संहितेची जागा घेणाऱ्या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत १७७ कलमात सुधारणा केली असून १४ कलमं काढून टोकण्यात आली आहेत, तर ९ नवीन कलमं आहेत. IPC म्हणजे भारतीय दंड संहितेची जागा घेणाऱ्या भारतीय न्याय संहितेत २१ नवीन गुन्ह्यांचा समावेश केला असून ४१ गुन्ह्यांसाठीच्या शिक्षेत वाढ केली आहे. इंडियन एव्हिडन्स अक्ट ची जागा घेणाऱ्या भारतीय साक्ष्य विधेयकात आता १६७ ऐवजी १७० कलमं असतील. २४ कलमांच्या तरतुदीत सुधारणा केली आहे. झुंडबळीच्या गुन्ह्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद नव्या कायद्यात आहे. तसंच पोलीस कारवाईत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीनं प्रथम माहिती अहवाल, पीडित व्यक्तीचा आणि आरोपीचा जबाब, इत्यादी प्रक्रिया डिजिटल पद्धतीनं करून ठरावीक कालमर्यादेत सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण व्हावी या उद्देशानं अनेक नियमांचा यात समावेश केला आहे, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळे ब्रिटीश प्रभावातून भारतीय कायदे व्यवस्था मुक्त झाली असल्याचं भाजपाचे निशिकांत दुबे यांनी विधेयकावरच्या चर्चेदरम्यान सांगितलं. एमआयएमचे असदउद्दीन ओवेसी यांनी या विधेयकांमधे अल्पसंख्य आणि मागासवर्गियांना प्रतिकूल होतील अश्या अनेक त्रुटी राहिल्या असल्याची टीका केली. शिरोमणी अकाली दलाच्या हरसिम्रत कौर यांनीही विधेयकात अनेक विरोधाभास असल्याची टीका केली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!