मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

शिवजयंती निमित्त युनिटी मल्टीकॉन्सच्या वतीने तालुकास्तरीय निबंध आणि चित्रकला स्पर्धाचे आयोजन

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने युनिटी मल्टीकॉन्स प्रा.लि. सोलापूरच्या वतीने नळदुर्गच्या किल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे १५१ पुतळे वाटप केले होते तर यावर्षी युनिटी मल्टीकॉन्सच्या वतीने शालेय विद्यार्थी यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तालुकास्तरीय भव्य निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे
युनिटी मल्टीकॉन्सचे कार्यकारी संचालक *कफिल मौलवी संचालक जयधवलं करकमकर आणि संचालक वैशालीताई जैन यांच्या संकल्पनेतून यावर्षी तालुकास्तरीय निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले आहे. ७ वी ते १० वी या वयोगटातील विद्यार्थी या स्पर्धामध्ये सहभागी होऊ शकतील..
नळदुर्ग शहरातल्या आंबाबाई मंदिर सभागृह येथे ही स्पर्धा संपन्न होणार आहे..
यावेळी युनिटीच्या वतीने आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहेत निबंध स्पर्धेचा विषय छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा आणि
चित्रकला स्पर्धेचा विषय १ ) छत्रपती शिवाजी महाराज
२ ) महाराष्ट्रातील गडकिल्ले
निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा या दोन्ही स्पर्धेसाठी अनुकमे बक्षीस
प्रथम पारितोषक २५०० रु. रोख आणि सन्मान चिन्ह
द्वितीय पारितोषक २१०० रु. आणि सन्मान चिन्ह
तुतीय पारितोषक १५०० रु. आणि सन्मान चिन्ह
चौथे पारितोषक ११ ०० रु आणि सन्मान चिन्ह
पाचवे पारितोषक ७५० रु. आणि सन्मान चिन्ह या प्रमाणे बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे दिनांक १० फेब्रुवारी २०२४ वार -शनिवार रोजी सकाळी १० वाजता ही स्पर्धा सुरु होईल
यावेळी होणाऱ्या उदघाटन सोहळाचे अध्यक्ष तुळजापूर तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी श्रीमती.एम.एम.इमानदार तर उदघाटन नळदुर्ग नगरीचे माजी नगराध्यक्ष शहबाज काझी यांच्या हस्ते होणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार विलास येडगे नळदुर्ग पत्रकार संघांचे अध्यक्ष सुहास येडगे जेष्ठ पत्रकार प्रा.पांडुरंग पौळ पत्रकार शिवाजी नाईक नळदुर्ग विकास सोसायटीचे चेअरमन संजय बेडगे खुदावाडी विकास सोसायटीचे चेअरमन अमोल नरवडे नळदुर्ग ब्राह्मण समाज संघटनेचे सचिव मुकुंद नाईक उपस्थित राहणार आहेत .
तरी जास्तीत जास्त शाळेने या स्पर्धामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन यूनिटी मल्टीकॉन चे मुख्य प्रवर्तनक तथा कार्यकारी संचालक कफिल मौलवी जयधवलं करकमकर आणि वैशालीताई जैन यांनी केले आहे
या कार्यक्रमाचे नियोजन नळदुर्ग किल्याचे युनिटीचे व्यवस्थाक जुबेर काझी आणि युनिटीचे जनसंपर्क अधिकारी विनायक अहंकारी हे करीत आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!