दयानंद सोनवणे यांची राज्यस्तरीय शैक्षणिक साहित्य प्रदर्शनासाठी निवड

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था नागपूर शिक्षण विभाग जिल्हा परिषद धाराशिव व जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ५१ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य प्रदर्शनात प्राथमिक विभागात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसंत नगर नळदुर्ग येथील प्राथमिक शिक्षक सोनवणे दयानंद नामदेव यांनी तयार केलेल्या गणित, विज्ञान व भाषा विकास या शैक्षणिक साहित्यात उच्च भरारी घेत जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
ज्ञान प्रबोधिनी विद्यालय हराळी ता.लोहारा येथे उप संचालक डॉ.गणपत मोरे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ दयानंद जटनुरे, उप शिक्षणाधिकारी फाटक यांच्या हस्ते मान्यवरांचा हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले शाळेचे अधिकारी, पदाधिकारी,शिक्षक,शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष, सदस्य व पालकांनी नळदुर्ग येथील पत्रकार शिक्षक नागरीकांनी अभिनंदन करत कौतुक केले आहे आणी पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत