राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लहान बाळांच्या मोफत हृदय तपासणीचे शिबिर
आ. जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
सांगली दि .३१ ( प्रतिनिधी )
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, आमदार जयंतराव पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अखंडितपणे सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिर अंतर्गत लहान बाळांच्या हृदयाची तपासणी मिरज येथे डॉ . शबाना मुजावर यांच्या जोया किड्स व डॉ . रियाज मुजावर यांच्या आर्यन हार्ट क्लिनिक ,वंटमुरे कॉर्नर मिरज येथे येत्या शनिवार दि . ३ फेबुवारी रोजी होणार आहे. अशी माहिती सांगली मिरज कुपवाड महानगरपालीकेचे माजी नगरसेवक आयुब बारगीर यांनी दिली.
यावेळी बोलताना बारगीर म्हणाले, आ. जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिरांतर्गत मागील सहा ते सात वर्षात आ. जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून लहान बाळांचे , एक दिवसापासून ते अठरा वर्षापर्यंतच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया ४८० शस्त्रक्रिया , मुंबईच्या, विविध हॉस्पिटलमध्ये, आतापर्यंत झालेल्या आहेत. प्रामुख्याने कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबई येथे झालेल्या आहेत .
हृदयरोग, तज्ञ paediatric cardiologist ) डॉ . प्रशांत बोभाटे , सर्जन डॉ . रॉय, डॉ . बिपिन यांच्याद्वारे शस्त्रक्रिया केल्या जातात . सदरचे ऑपरेशन आम्ही पूर्णपणे मोफत करतो रुग्णाच्या राहण्याची व जेवणाची ही सोय केली जाते . यासाठी आरबीएसके मधून व मुख्यमंत्री सहायता निधी व आ. जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून काही संस्थांच्या अर्थसाहाय्याने आम्ही शस्त्रक्रिया मोफत करतो. सदरचे शिबिर पूर्णपणे मोफत राहील. शिबिरात येणाऱ्या लहान बालकांना दुधाची सोय केली आहे . तसेच त्यांच्या नातेवाईकांना चहा व नाश्त्याची सोय केली आहे. तरी सांगली जिल्ह्यासह राज्यातील सर्व गरजुंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी वैद्यकीय सेलचे जिल्हा प्रमुख नगरसेवक आयुब बारगीर यानी केले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर जिल्हाध्यक्षा संगिता हारगे , डॉ . नर्गिस सय्यद, अभिजित हरगे, विजय माळी, अजीम मुल्ला शारदा माळी, इर्शाद पखाली, अझहर सय्यद, अकबर शेख, संदीप व्हनमाने , आकाश कांबळे, वाजिद खतीब, अंजर फकीर व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत