भारतातल्या हिमबिबट्यांच्या संख्येचा परीक्षण अहवाल प्रसिद्ध…

या प्राणिजातीच्या भारतातल्या अस्तित्वाबद्दल प्रसिद्ध होणारा हा पहिलाच शास्त्रशुद्ध अभ्यास आहे. भारतातल्या हिमबिबट्यांच्या संख्येचा परीक्षण अहवाल आज केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी नवी दिल्ली इथं प्रसिद्ध केला. सध्या देशात एकूण ७१८ हिमबिबटे असून त्यातले सर्वाधिक ४७७ लडाखमधे आहेत. भारतीय वन्यजीवन संस्थेमधे हिमबिबट्यांची सातत्यानं पाहणी आणि अभ्यास करण्यासाठी वेगळा विभाग ठेवावा असं या अहवालात सुचवलं आहे. त्याखेरीज उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, आणि जम्मू – काश्मीरमधेही हिमबिबटे आढळतात.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत