मक्तेदारांची महानगरपालिका, जळगाव!

शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यात उमेदवारी करतांना अट आहे कि,तो उमेदवार मक्तेदार नसावा.का?काय कारण असेल? जेणेकरून या माणसाने आपल्या पदाचा वापर किंवा गैरवापर करून मक्ता घेऊ नये. घेतला तर तो अतिरिक्त निधी मंजूर करून घेऊ शकतो. काम न करता बील काढून घेऊ शकतो. निकृष्ठ काम केले तरीही पुर्ण बील काढून घेऊ शकतो.म्हणून ही खबरदारी उमेदवारी अर्ज भरतांना घेतली जाते.कायदा बरोबर आहे, निती खराब आहे. महाराष्ट्रात जळगाव शहर महानगरपालिका ही मात्र या तत्वानुसार चालत नाही.येथील सर्वच नगरसेवक आणि आमदार सुद्धा मक्तेदार आहेत.त्यांचे स्वताचे नाव व्यतिरिक्त मुलगा,जावई,सालदार,नोकर, ड्राईव्हर, मित्र यांचे नावाने मक्ता घेतात.आणि बांधकामाचे कोणतेही प्रशिक्षण,साधन नसतांना कोणाकडूनही कामे करून घेतात.किंवा शहर अभियंता कडून बोगस मेझरमेंट बुक भरून घेतात.बील काढतात.अभियंता खोटे मेझरमेंट बुक का भरून देतो? कारण तो सुद्धा यातील आर्थिक भागीदार असतो.काही तर अन्य ठिकाणी भ्रष्टाचार करतात. तेथे हा नगरसेवक,हा आमदार त्याला मदत करतो.चोर चोर सासरा जावई! जळगाव शहरातील कोणताही मक्तेदार आपली ऐपत,आपली कुवत,आपले कौशल्य,आपली साधने नुसार महानगरपालिकेच्या कामाचे टेंडर भरू शकत नाही.भरले तरीही ते कधीच पास होत नाही.त्यासाठी तो नगरसेवक किंवा आमदाराला विनंती करतो.कि, तुम्ही जर काही काम घेत असाल तर मी इतके टक्के काढून काम करून देईन.तर मला काम मिळावे. नगरसेवक, आमदार यांचा कामदार सोबत सौदा झाल्यावर त्याला टेंडर भरण्यासाठी सुचवले जाते.कोणत्या कामदाराने कोणते टेंडर कोणत्या दराने भरावे,हे आधीच ठरवले जाते.तशी वाटणी नगरसेवक आपसात करून घेतात.तू ते भर.मी हे भरतो.तू माझ्या टेंडरमधे गडबड करायची नाही.मी तुझ्या टेंडर मधे गडबड करणार नाही.केली तर मी आहे आणि तू आहे.माझ्यासारखा वाईट माणूस जळगाव मधे कोणीच नाही.अशी वाईट माणसे जळगाव मधील महानगरपालिकेत नगरसेवक आहेत. ज्यांच्या नावाने बांधकाम रजिस्ट्रेशन आहे,तो मक्तेदार नाही.तो फक्त कामदार आहे.खरा मक्तेदार तर नगरसेवक आहे.खरा मक्तेदार तर आमदार आहे.खरा मक्तेदार तर आमचा मंत्री आहे.हे माहिती नसलेला फक्त शिवराम पाटील नाही.ज्याला माहिती नाही,तो बिनडोक असू शकतो.माहिती असूनही बोलत नाही तो नपुसक असू शकतो.
टेंडर भरून मक्ता घेण्यासाठी नगरसेवकांमधे भर महासभेत नगरसेवकांची हाणामारी झाली आहे.त्याचे व्हिडिओ चित्रण पुर्ण महाराष्ट्रात प्रसारित झाले आहे.एक तरूण मोठ्या उत्साहाने टेंडर भरायला गेला.भरले.नगरसेवकांच्या लक्षात आले.तर नगरसेवकांनी त्याला दम भरला.का रे! तू आताचा शेंबड्या आला भडव्या.आणि आमच्यात लुडबुड करतो.आम्ही वीस वीस लाख खर्च करून निवडून येतो.आणि तू फुकटात टेंडर भरतो.म्हणून ते टेंडर त्याच्या नातेवाईकाची बायको नगरसेवक होती,तिने घेतले.तिच्या नवऱ्याने या तरूणाला दिले.त्याला सबठेकेदार म्हणतात.त्याचेकडून काम तर करून घेतले.आणि पैसे दिले नाहीत.याचा राग येऊन तरूणाने महानगरपालिका अभियंत्याला लांच कबूल केली.आणि अण्टिकरप्शनचे जाळे टाकून पकडून दिले.त्याचा राग नगरसेवक व अभियंता व आयुक्त यांना आला.मागील दहा वर्षात त्या तरुणाला एकही मक्ता दिला नाही.यालाच मोदी म्हणतात,हमारा विकास और जवानोका सत्यानाश! जळगाव शहरातील नगरसेवक अशा अनेक कामांची वर्क ऑर्डर खिशात घेऊन फिरतात.जो जास्त मार्जिन देऊन काम करील असा कामदार शोधतात.रायसोनीनगर मधील प्रभाग तेरा मधील रस्ते कामाची वर्क ऑर्डर एका नगरसेवकाचा पती खिशात घालून दरदर भटकत आहे.अश्वस्थामा सारखा.अजून ते काम कोणताही कामदार घेत नाही.कारण तेथे आम्ही जनजागृती केली आहे.म्हणे यात पुर्ण काम केले तर नफा मिळत नाही.मी स्वतः आयुक्त बाईसाहेब आणि अभियंता भाऊसाहेब, आमदार मामासाहेब यांना भेटलो.त्यांनी सुद्धा हतबलता व्यक्त केली.काका,येथे असेच चालते.तुम्ही नालायक मतदार नालायक नगरसेवकांना निवडून देतात.आणि इकडे आमचे डोके खातात.आम्हाला डोके नाही.फक्त खोके आहेत.हे शिंदेंचे सरकार आहे.
जळगाव शहरातील रस्ते गटारी ची अशी अनेक वर्क ऑर्डर दोन वर्षांपासून निर्गमित झालेल्या आहेत.पण काम करीत नाहीत.आम्ही बोंबाबोंब केली तर आधिकारी उत्तर देतात, आम्ही आमचे काम केले.आता तुम्ही नगरसेवक आणि आमदार कडे जा.आम्ही अनेकदा प्रयत्न करूनही नगरसेवक आणि आमदार फुरसत मधे सापडत नाहीत.म्हणून आम्ही त्या प्रभागात जाऊन मोघम पणे बरे वाईट बोलतो.चोर, हरामखोर, बदमाष, कमीशनखोर वगैरे वगैरे.तेंव्हा ते नगरसेवक आणि तो आमदार कोणातरी कामदाराला गळ घालून काम करायला सांगतो.म्हणून बरीच कामे झाली.यातील कामदार सुद्धा नगरसेवक व आमदारांचे रक्ताचे नातेवाईक आहेत.सांगा चोर आणि पोलिस भाऊ भाऊ,बाप बेटा ,सासरा जावई,नवरा बायको असतील तर तक्रार कोणाकडे करणार.
मोरे सैंया ठाणेदार,रपट मा कि लिखे?
कागज मारा सिनेमे ,पेन थारे खानेमे.
कुछ भी लिखे ,तो गुलाबका फुल दिखे.
जळगाव शहरातील प्रभाग पंदरा मधील नगरसेवकांनी कौरव पांडव सारखे भांडण न करता सरळ रस्ता आणि गटार वाटून घेतली.एकाने रस्त्याचे मक्ते घेणे.दुसऱ्याने गटारीचे मक्ते घेणे.काय ट्युनिंग आहे,चोरांमधे?असे ट्युनिंग सज्जनांमधे का नाही?आता ते आमदार बनण्यासाठी बाशींग बांधून हळद चोपडून घेत आहेत.जितेंगे तो और भी कमायेंगे.
जळगाव शहरातील महानगरपालिका तर लोकशाहीचा सर्वोत्तम नमुना आहे.येथे अडीच वर्ष नवरा आमदार आणि बायको महापौर होते.येथे अडिच वर्षे बायको महापौर तर नवरा विरोधी पक्ष नेता होते.आठलूंग थठलूंग आपलच से.हाईबी तेबी आपलच से.मोदी आणि खरगे एकाच खोलीत, एकाच पलंगावर झोपले तर पार्लमेंट चे अधिवेशन का घ्यावे? चालवले तर मुद्दा काय चर्चेला घ्यावा?जर चोर चोर मौसेरे भाई असतील तर!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत