
भारतीय रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दिल्लीकडे जाणाऱ्या सुमारे ११ पॅसेंजर ट्रेन वेळापत्रकापेक्षा एक तास ते सहा तासांनी उशिरानं धावत होत्या. देशाच्या अनेक भागांमध्ये धुक्यामुळे अनेक रेल्वे गाड्या उशिरानं धावत आहेत. या गाड्यांमध्ये वास्को निजामुद्दीन एक्स्प्रेस, कामाख्या दिल्ली जंक्शन ब्रह्मपुत्रा मेल, जम्मूतावी अजमेर पूजा एक्स्प्रेस, कटिहार अमृतसर एक्स्प्रेस, मुझफ्फरपूर आनंद विहार एक्स्प्रेस आणि इतर गाड्यांचा समावेश आहे. लोकांनी अनावश्यक प्रवास टाळावा असा सल्ला रेल्वेनं दिला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत