देशदेश-विदेशभारतमुख्यपानसंपादकीय

पाकिस्ताननं केलेल्या ड्रोन हल्ल्याचा इराणकडून निषेध…

दोन्ही देश सध्या एकमेकांच्या हद्दीतल्या दहशतवादी तळांवर हल्ले करत आहेत. पाकिस्तानने इराण बरोबरच्या आपल्या सीमा रेषेजवळ दहशतवाद्यांविरोधातल्या कारवाई दरम्यान बिगर इराणी ग्रामस्थांवर केलेल्या लष्करी हल्ल्यांचा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने निषेध केला असून, हे कृत्य ‘असंतुलित आणि अस्वीकारार्ह’ असल्याचं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर इराणच्या परराष्ट मंत्रालयाने हे निवेदन जारी केलं. पाकिस्ताननं आपल्या भूमीवर दहशतवादी गटांच्या कारवाया रोखण्याची जबाबदारी पार पाडावी, अशी मागणीही इराणनं केली आहे. पाकिस्तानबरोबर चांगले शेजारी आणि बंधुभावाची आपली भूमिका कायम असून, प्रादेशिक अखंडता आणि नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं यात म्हटलं आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!