देश-विदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

बोज्जनकोंडा येथे भरला मेळा, बौद्ध संस्कृतीचा फुलला मळा Baudha Mela at Bojjannakonda in AP draws huge crowds.

संजय सावंत

आंध्र प्रदेशामध्ये बोज्जनकोंडा या प्राचीन बौद्ध स्थळावरती नुकताच मेळावा भरला होता. तुडुंब गर्दीने तो फुलून गेला होता. हा मेळावा शंकरम ( म्हणजेच बोज्जनकोंडा) येथील विशाखा बौद्ध संघ सम्यका संस्थेतर्फे भरविण्यात आला. येथे असंख्य उपासक नुसत्या विशाखापट्टणम वरून नाही तर विजयानगरम आणि श्रीकाकुलम या जिल्ह्यातून देखील आले होते. दरवर्षी संक्रातीनंतर दुसऱ्या दिवशी येथे हा बौद्ध मेळावा भरतो.

या मेळाव्यामध्ये अनकापल्लीचे खासदार डॉ. सत्यवती या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी सांगितले की केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मिळून हे बौद्ध लेणी असलेले स्थळ विकसित करण्याचे ठरविले आहे आणि त्यासाठी पंधरा कोटीचा निधी दिलेला आहे. त्याचे काम सुरू झाले असून दोन महिन्यात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्यांनी पुढे आशावाद व्यक्त केला की हे काम पूर्ण झाल्यावर जागतिक बौद्ध पर्यटन स्थळांमध्ये बोज्जनकोंडा या बौद्ध लेणी स्थळाचा नक्कीच समावेश होईल.

हे सर्व वाचल्यावर मुंबई-पुणे जवळील भाजे लेणी परिसर हा बौद्ध मेळावा घेण्यास योग्य ठिकाण असल्याचे मला उगीचच वाटून गेले. त्याच बरोबर महाराष्ट्रातील अतिक्रमण झालेल्या बौद्ध लेण्यांची अवस्था माझ्या डोळ्यासमोर आली आणि अनेक प्रश्न उभे राहीले. आपले आमदार, खासदार बौद्ध लेण्यांना का भेट देत नाहीत ? त्यांना प्राचीन बौद्ध स्थळांविषयी माहिती नाही का ? त्याबद्दल त्यांना आस्था वाटत नाही का ? बौद्ध स्थळांच्या विकासासाठी राज्यांकडे आणि केंद्राकडे ते का पाठपुरावा करीत नाहीत ? देवळांच्या विकासासाठी हजारो कोटी खर्च केले जातात. मात्र प्राचीन बौद्ध संस्कृतीच्या वारसा स्थळांना एक रुपया देखील मिळत नाही याची कुणालाच खंत का वाटत नाही ?

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!