नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्यात पर्यटकां सोबत मकर संक्रात साजरी

तिळ गुळ घ्या दरवर्षी किल्ल्याला भेट दया यूनिटी मल्टीकॉन्स कंपनीचा अनोखा उपक्रम .
-नळदुर्ग दादासाहेब बनसोडे नळदुर्ग किल्यात युनिटी मल्टीकॉन्स कडून तिळ गुळ घ्या गोड गोड बोला आणी दर वर्षी ऐतिहासिक किल्ल्याला भेट दया पर्यटकां सोबत यूनिटी मल्टीकॉन्स कंपनीने केला पर्यटकां सोबत मकर संक्रांत साजरी .सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या युनिटी मल्टीकॉन्स नळदुर्ग साईटच्या वतीने आज मकरसंक्रात निमित्त किल्यातील पर्यटकां बरोबर तिळगुळ वाटप करुन सामाजिक प्रबोधन करण्याचा वारसा जपला आहे .युनिटी मल्टीकॉन्स कंपनी नळदुर्ग किल्याचे व्यवस्थापक जुबेर काझी यांच्या हस्ते पर्यटकांना तिळगुळ चे वाटप करण्यात आले.यावेळी जेष्ठ नागरिक खालिद काझी ,युनिटीचे जनसपंर्क अधिकारी विनायक अहंकारी हाजी मस्तान शेख प्रदीप गायकवाड , नागेश लंगडे , अमीर फुलारी , विक्रम बारुळे कृष्णा ललाटे उपस्थित होते..यावेळी आलेले पर्यटक सुद्धा या सुंदर कार्यक्रमाने भारावून गेले होते हिंदू मुस्लिम समाज मिळून हा मानवता शिकवणारा मकर संक्रात सण नळदुर्ग किल्यात युनिटीच्या वतीने साजरा करण्यात आला . आसा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी व्हावा जेणेकरुन समाजातली एकमेकांबद्दलची कटुता पण कमी होईल…युनिटी कंपनीचे कार्यकारी संचालक कफिल मौलवी.. युनिटीचे संचालक जयधवल करकमकर व युनिटीचे संचालक श्रीमती वैशाली ताई जैन हे तीन वेगवेगळ्या धर्माचे आणि विचाराचे एकत्र येवून काम करतात..त्यांच्यातला गोडवा जसा रोज कामातून व्यक्त होतो.. तसा आदर्श समाजासमोर यावा यासाठी युनिटी मल्टीकॉन्स वेगवेगळ्या समाजीक उपक्रमातून काम करीत आहे सामाजिक प्रबोधन करत त्यानी एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतले आहेत .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत