मुख्यपान

नव्या संसद भवनाची वैशिष्ट्ये

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी २८ मे रोजी संसदेच्या उद्घाटन केलेल्या पंचकोनी नवीन संसदेच्या विशाल इमारतीमध्ये लोकसभेत किमान ८०० व जास्तीत जास्त १,२८० सदस्य तसेच राज्यसभेत ३०० सदस्य बसू शकतात.
  • ६४,५०० चौरस मीटरवर बांधलेली ही चार मजली इमारत जुन्या संसदेपेक्षा १७ हजार चौरस मीटरने मोठी आहे. ती संपूर्णपणे भूकंपरोधी आहे.
  • नवीन संसद भवनाच्या पहिल्या तीन दरवाजांना अश्व, गज आणि गरुड अशी नावे आहेत. त्यांनाच ज्ञान, शक्ती आणि कर्म द्वार असेही म्हटले जाईल. उपराष्ट्रपती, सभापती आणि पंतप्रधान याच तीन प्रवेशद्वारांचा वापर करतील.
  • खासदार व सामान्य जनतेसाठी मकर, शार्दुल आणि हंस द्वारांचा वापर केला जाणार आहे.
  • नवीन संसदेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे संविधान सभागृह. या सभागृहात राज्यघटनेची प्रत ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि देशाच्या सर्व पंतप्रधानांची मोठी छायाचित्रेही येथेच लावलेली आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!