जळगावात साकारली मदर्स मिल्क बँक.

जळगाव: ज्या महिलांना प्रसूती नंतर दुधाची समस्या असेल अशा वेळी इतर माताचे दूध दानरुपाने घेऊन सुरक्षित वातावरणात जतन करून गरजू नवजात बालकांना पुरविता येईल अशी सुसज्ज यंत्रणा असलेली सुविधा जळगाव जिल्हा रुग्णालयात सुरु करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारलेली ही उत्तर महाराष्ट्रातील पहिली मदर मिल्क बँक नवजात शिशुंसाठी नवसंजीवनी ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
जळगाव जिल्हा रुग्णालयात आज ‘मदर मिल्क बँक ‘ कार्यान्वित झाली. पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री. ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. किरण सोनवणे उपस्थित होते.
प्रसूतीनंतर अनेक मातांना पुरेसं दूध येत नाही. काहींना उपचारामुळे शिशूंना दूध पाजता येत नाही. अशावेळी अनेक शिशुंना दुर्दैवाने गाईचे किंवा पावडरचे दूध पाजावे लागते. परंतु शिशुंना आईचेच दूध मिळावे या दृष्टीने ह्यूमन मिल्क बँक जिल्हा वार्षिक योजनेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून साकारण्यात आल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत