डॉक्टरांनी कॅपिटल अक्षरांतच प्रिस्क्रिप्शन लिहून देण्याचे आदेश…

भुवनेश्वर, दि. ९ – डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते जेव्हा प्रिस्क्रिप्शन लिहून देतात तेव्हा ती इंग्रजी भाषा वाचणे म्हणजे दिव्याचे काम असते. ही भाषा फक्त कोणाला कळू शकेल तर तो केमिस्ट असतो. पण बऱ्याचदा केमिस्ट अर्थात औषध विक्रेत्यांना देखील डॉक्टरांनी नेमके कुठले औषध लिहून दिले हे त्यांच्या झिंगझॅंग लिखाणामुळे कळत नाही. त्यामुळे चुकीची औषधे रुग्णांना दिली गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. या पार्श्वभूमीवर ओडिशा हायकोर्टाने राज्याच्या आरोग्य विभागाला आदेश दिलेत की, डॉक्टरांनी औषधांची प्रिस्क्रिप्शन्स, पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आणि मेडिकोलिगल कागदपत्रे ही स्पष्ट आणि सुटसुटीत हस्ताक्षरात लिहावे किंवा सरसकट कॅपिटल अक्षरांमध्ये लिहावे.
न्या. एसके पानीग्रही यांनी ओडिशाच्या मुख्य सचिवांना है आदेश दिले आहेत. हायकोटाचा हा आदेश सर्व वैद्यकीय केंद्रे, खासगी क्लिनिक्स आणि मेडिकल कॉलेजमध्ये सगळीकडे प्रसारित करावेत जेणे करून सर्वांना याची स्पष्टता येईल. तसेच न्यायव्यवस्था आणि जनता या दोन्हींसाठी सुलभता वाढवावी.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत