पश्चिम महाराष्ट्र सोलापूर बौद्ध धम्म परिषद
बौद्ध धम्म परिषद
रविवार दि.24 मार्च 2024
स्थळ- टाकळी ( सिकंदर ) ता.मोहोळ जि.सोलापूर.
संयोजक-
भंते सुमेधजी नागसेन
9960498358
परम पूज्य बोधीसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे सोलापूर जिल्ह्य़ात साधारण 12 वेळेस आले होते . बाबासाहेबांच्या सहवासात अनेक लोकं या जिल्ह्य़ात निर्माण झाले होते . माता रमाई सोलापूर जिल्ह्य़ातील बावी या गावी काही महिणे मुक्कामी होत्या. जगातील सर्वात मोठ्ठी भिम जयंती सोलापूर जिल्ह्य़ात होते .
आता सोलापूर जिल्ह्य़ात बौद्ध धम्माची चळवळ गतीमान करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे . धम्म चळवळीला पैसा कधी कमी पडत नाही , काम जस वाढत जाईल तसे श्रद्धा संपन्न लोक निर्माण होतील . परम पूज्य बोधीसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली सोलापूरची भूमी पून्हा बुद्ध सरणं गच्छामीचा निनाद करण्यासाठी सज्ज होत आहे . सोलापूर जिल्ह्य़ातील मोहळ तालुका नॅशनल हायवेवर आहे . मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर या गावात एक श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक दोन एकर जागा बुद्ध विहारासाठी दान देत आहेत. याच जागेवर आपण पहिली अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करत आहोत. या धम्म परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी पूज्यनिय भिख्खू संघ उपस्थित राहुण असून अनेक मान्यवर या ऐतिहासिक धम्म परिषदेला येणार आहेत. आपण या नव्याने होत असलेल्या ऐतिहासिक बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहुण सहकार्य करावे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत