शाळांपासून ५०० मीटरच्या परिसरात गुटखाविक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी समिती स्थापना केली जाणार…

नाशिक इथे आयोजित अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आढावा बैठकानंतर, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. शाळांपासून ५०० मीटरच्या परिसरात गुटखाविक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी समिती स्थापना केली जाणार असून,अवैध गुटखा विक्रीप्रकरणी तीन वेळा कारवाई झालेला विक्रेता पुन्हा विक्री करताना आढळला तर त्याच्यावर थेट मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. या विभागात ५०० जणांची भरती लवकरच केली जाईल, तसंच सरकारी-खाजगी भागीदारी तत्वावर अन्न भेसळ तपासणी प्रयोगशाळा तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितलं. १० फिरत्या प्रयोगशाळा प्रगतीपथावर असल्याची माहितीही आत्राम यांनी यावेळी दिली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत