आर्थिकमहाराष्ट्रमुख्यपान

बेमुदत कांदा लिलाव बंद!

शुक्रवारी कांद्याच्या दरात एक ते दीड हजार रुपयांनी घसरण झाली. केंद्र सरकारने अकस्मात निर्यात बंदी लागू केले होते. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी लिलाव बंद पाडत आंदोलन केले. चांदवड येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. दुसरीकडे नाशिक जिल्हा कांदा व्यापारी संघटनेने लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कांदा निर्यातीवर बंदी आल्याची प्रतिक्रिया घाऊक बाजारात उमटली. पिंपळगाव बाजार समितीत आदल्या दिवशीच्या तुलनेत दरात दोन हजारांची तफावत पडल्याचा आक्षेप शेतकऱ्यांनी घेतला. गुरुवारी या बाजार समितीत नवीन लाल कांद्याला प्रति क्विंटल सरासरी २५०० रुपये तर उन्हाळला ३२०० रुपये दर मिळाले होते. शुक्रवारी नव्या लाल कांद्याचे दर १८०० रुपयांपर्यंत घसरले. उन्हाळ कांद्याचे लिलाव झाले नाहीत. कांद्याला किमान तीन हजार रुपये क्विंटल दर मिळायला हवेत, असा आग्रह शेतकऱ्यांनी धरला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!