रशियाकडून सज्ज महासंहारक ‘सॅटन २’ अण्वस्त्र

नवी दिल्ली : जगातील अत्यंत संहारक अण्वस्त्रांपैकी एक मानले जाणारे सॅरमॅट आंतरखंडीय क्षेपणास्त्र रशियाने सज्ज ठेवल्याचे वृत्त आहे. त्यामुळे युरोपची चिंता वाढली आहे. स्पूटनिक न्यूजने याबाबत बातमी दिली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या चढाईनंतर आता रशियाची बाजू काहीशी बचावात्मक झाल्याचे दिसत असताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दूरचित्रवाणीवरून देशवासियांना आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे.
रशियाचे आर-एस २८ सॅरमॅट हे एसआय १० आधारित क्षेपणास्त्र आहे. ते १५ आण्विक स्फोटके वाहून नेण्याच्या क्षमतेचे आहे. नाटोकडून त्याचा उल्लेख सॅटन २ असा केला जातो. या क्षेपणास्त्रामुळे शत्रुला रशियाविरोधात पाऊल उचलण्याआधी दोन वेळा विचार करावा लागेल, असे पुतिन यांनी म्हटले होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत